स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलचे खेळाडूं विभागीय मैदानी, सायकलींग व स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत भाग घेणार

830

राजुरा: जिल्हास्तरीय शालेय मैदानी, स्क्वॅश व सायकलींग क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची विभागीय शालेय स्पर्धेकरिता निवड
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद वतीने, जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कु. आयुष्य पिपरे याने 80 मिटर हर्डल्स व उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात कु. युवराज तांडी याने हातोडा फेक व बांबू उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात कु. स्टेला पीटर हिने भालाफेक मध्ये द्वितीय, बाबू उडीत प्रथम तर उंच उडीत तृतीय स्थान पटकावले, कु. पलक मसाडे हिने हातोडा फेक मध्ये द्वितीय स्थान पटकावले यांची नागपूर येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांमध्ये कु. श्लोक भेंडे प्रथम, तर मुलींच्या गटात कु अनुष्का फरकाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच जिल्हा स्तरीय सायकलिंग स्पर्धेत कु. मोहत्तसीम शेख टाईम ट्रायल मध्ये प्रथम, कु. इर्शाद शेख यांने मास ट्रायल मध्ये प्रथम, मुलींमध्ये कु. अनुष्का फरकाडे हिने टाइम ट्रायल मध्ये प्रथम, कु. मानसी वांढरे हिने मास ट्रायल मध्ये प्रथम क्रमांक पटकावले हे सर्व स्पर्धकांची नागपूर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री भास्कर फरकाडे, प्रज्ञा मॅडम, अश्वती मॅडम, निलम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रभा डी. एम, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी श्री संदिप उईके,श्री. विजय ढोबाळे, श्री पंधराम सर, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.