श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे पदवीदान दीक्षांत समारंभ…

696

चंद्रपूर:  आज दि.१२/१०/२०२३ ला संस्थेत ” पदवीदान दिक्षांत समारंभ ” आयोजित करण्यात आला ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.भाग्यश्री वाघमारे मॅम,(जिल्हा कौशल्य अधिकारी चंद्रपूर),कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री अमित व्ही येरगुडे सर,(सचिव येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस) तसेच गटनीदेशक श्री संजय बाकरे उपस्थित होते ह्याप्रसंगी जुलै २०२३ मध्ये प्रावीन्यप्राप्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सत्र २०२३-२४ करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ह्यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री.अमित व्ही येरगुडे सर ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करित शुभेच्छा देऊन पुरस्कृत केले आणि प्राचार्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेविषयी माहिती देऊन संस्थेची ओळख करून दिली आणि सौ वाघमारे मॅम ह्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले ह्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रीमती विद्या व्ही येरगुडे मॅम आणि उपाध्यक्ष मा.श्री. अभिषेक व्ही येरगुडे सर ह्यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संस्थेतील सर्व निदेशक/कर्मचारी वर्ग तसेच अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन निदेशिका कु.वर्षा गावंडे ह्यांनी केले. प्राचार्य श्री राजेश एम पेशट्टीवार