हिवरा येथे तंटामुक्तीच्या महिलांनी अवैध दारू पकडली… धाबा पोलीस स्टेशनची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई… मोजताना निघाले नव्व्यांनव देशी दारूचे टिल्लू…!!

1099

गोंडपिपरी : तालुक्यातील धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा या गावात बाईकने अवैध दारू घेऊन येत असलेल्या दारू विक्रेत्यास गावातील तंटामुक्तीच्या महिलांनी अडवून त्याची दारू पकडली.

सविस्तर वृत्त असे की, गावात मागील दिवसांमध्ये अवैध दारूची विक्री सर्रास सुरू होती. परंतु मध्यंतरी गावातील महिलांनी एकत्रित येऊन दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीवर महिलांची टीम गठित केली. तंटामुक्त समितीवर महिला संघटित टीम तयार झाल्यानंतर गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले.परंतु काही दिवसांपासून हे अवैध दारू विक्रेते काही प्रमाणात लपून-छपून दारू विक्री करतच होते.
दरम्यान आज सकाळी ८:०० चें सुमारास बाईकने विक्रेता सूर्यकांत मुंजनकर हा अवैध दारु घेऊन येत असताना एक पोलीस कर्मचारी समोरून येताना त्या विक्रेत्याला दिसला, त्यांनी पोलिसांना पाहून तिथेच गाडी वडविली व बाजूच्या एका घराकडे टाकली. परंतु त्याच्या अचानक गाडी फिरवल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात शंका आली. जवळच बाजूला तंटामुक्ती अध्यक्षांचे घर असल्याने हा दारू विक्रेता असल्याचे लक्षात आले.जिकडेतिकडे माहिती पोहोचतात संपूर्ण तंटामुक्तीच्या महिलांची टीम एकत्र होऊन त्या दारू विक्रेत्यास रस्त्यावरच अडवत त्याची दारू पकडली. त्याचे दारूचे पेटारे खाली करून मोजले असता तेथे नव्यानव टील्लू निघाले. आता मात्र या अवैध दारू विक्रेत्यास अद्दल घडली नसेल तर आम्ही महिला वारंवार यांच्या दारू विक्रीकडे नियंत्रण ठेवू व यांची दारू पकडून कारवाई करिता पोलिसांचे स्वाधीन करू आणि आज त्या दारू विक्रीत्याला व त्याच्याकडे मिळालेला नव्व्यनव टिल्लू दारू साठा पोलिसांचे स्वाधीन झाला आहे अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्षांनी दिली.
कारवाई दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष विभागीताई तेजराज कूत्तरमारे, पोलिस पाटील गिरीश रामटेके,तंटामुक्तीच्या सदस्या सुरेखाताई विरुटकर,अर्चना मशाखेत्री, शालिनी कांबळे, सरिता कुत्तरमारे, सुनंदाबाई नेवारे, पल्लवी जांभुळे, गीताताई कुत्तरमारे, सुलोचना डोंगरे,धाबा पोलीस कर्मचारी श्री. कुळसंगे व श्री. शिंदे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.