राजुरा: २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी मौजा ग्रामपंचायत जामनी तह राजुरा इथे जयसेवा पुरुष मंडळ यांच्या आयोजनाने पाडी पारी कुपाल लिंगू धर्मगुर सल्ले सक्ती नालुंग सगाला परसापेन कृपेने बांधकाम पूर्ण होऊन वास्तूपुजन व उद्घाटन सोहळा सर्व मान्यवरांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे उद्घाटक, राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे साहेब उपस्थित होतें. यांच्या हस्ते सल्ला शक्तीचे वास्तूपुजन व उद्घाटन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री भिमरावजी मडावी साहेब ( मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर तसेच विधी पुजन पाहुणे , किसनजी कोरांगे पाटिल उपस्थित होते.
प्रमूख पाहुणे म्हणून नानाजी आदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर प्रमूख अथिती म्हणून सीतारामजी कोडापे माजी सभापती पंचायत समिती कोरपना शामरावजी कोटणाके सरपंच ग्रा. भेंडवी जंगु वेडमे सरपंच, सोनापुर दिलीपजी राऊत माजी सरपंच ग्रा नोकारी खुर्द प्रमूख उपस्थिती
पंकजजी उपासे साहेब( ग्रामसेवक ग्रामपंचायत जामनी)
पुष्पकुमारजी भगत पोलिस पाटील जगदिशजी किन्नाके सरपंच जामणी चपंतजी किंनाके संचालक आदिवासी सोसायटी वनसडीतसेच ईतर सर्व गावकरी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची रूपरेषा सरपंच साहेबांनी अतिशय प्रेमळ आणि मार्मिक पद्धतीने मांडली , गावच्या अजुन काही समस्या आमदार साहेबाला सांगून त्या पुर्ण करुन द्याव्या, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली सल्लाषक्तीचे महत्व आजच्या तरुण युवा पिढीला प्रेरणा आणि आदर्श देणारे ते स्तंभ आहे असे त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.
आमदार जी सुभाष धोटे साहेब बोलताना, सल्लशक्तीचे महत्व गावकऱ्यांना पटवून दिले, आपला भाग क्रांतीकारी म्हणून सर्व जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या समाजाच्या उन्नती साठीअनेक वीर योद्धा नी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यांचं आपण कार्य लक्षात ठेवलं पाहिजे , आणि गावकऱ्यांच्या मागण्या लवकरच पुर्ण करु अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावजी मडावी साहेबांनी गावकऱ्यांना समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपले संविधानिक हक्क कशे प्राप्त केले पाहिजे याबद्दल महत्व पटवून दिले. आपला समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे ,असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.तसेच ईतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाकरिता सर्वांनी सहकार्य केले , आणि अतिशय शांतपणे हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्री तिलक पाटील यांनी केले आभार प्रदर्शन रोहित राऊत यांनी केले.