बळीराम काळे, जिवती
जिवती : (ता.प्र.) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष,पंचायत समिती जिवती अंतर्गत आज दिनांक 06-11-2023 रोज सोमवार ला पंचायत समिती परिसर येथे दिवाळी फराळ मोहत्सव चे उदघाटन मा.श्री डॉ.भागवत रेजिवाड सर गट विकास अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील समूहातील महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधावी व आपल्या कडील निर्मित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 06 ते 11 नोव्हेंबर पर्यंत फराळ मोहत्सव लावण्यात आलेले आहेत . या फराळ मोहत्सव मध्ये समूहातील महिलांनी विविध खाद्य वस्तू चिवडा, अनारसे, तिळाचे लाडू, शेंगदाणाचे लाडू, बर्फी, मोतीचूर लाडू, सेव, चकल्या, तसेच दिवे, वात, रांगोळी विक्री साठी स्टॉल वर लावण्यात आले होते. मा. श्री. डॉ.भागवत रेजिवाड सर गट विकास अधिकारी यांनी सर्व कर्मचारी यांना फराळ मोहत्सव ला भेट देऊन वस्तूंची खरेदी करण्याचे आव्वाहन केले. आज तालुक्यातील सर्व ग्रामसेवक अधिकारी यांनी स्टॉल ला भेट देऊन मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली. उदघाटन प्रसंगी मा. श्री. शेंडे सर विस्तार अधिकारी ( पंचायत), श्री. राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक, यांची उपस्थिती होती. तयार करण्यात आलेल्या फराळ वस्तूंची पॅकेजिंग व विक्री बाबत तालुका कक्ष येथील सर्व कर्मचारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सर्व कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, उद्योग सखी, व इतर कॅडर यांनी सदर प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.