लाल हेठी (घोसरी ) येथील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या पाणीच्या टाकीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे… पाणी टाकी बनविण्याअगोदरच फोडले सिमेंट काँक्रेटचे रोड व नाली…

273

प्रशांत झाडे (पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी)

जल जीवन मिशन अंतर्गत गाव तिथे पाणी या योजनेअंतर्गत मौजा लालहेटी घोसरी येथे 62,00000/-लक्ष ( अंदाजपत्रकीय रक्कम ) पाणी टाकीचे काम मंजूर झाले असून, सदर कामासाठी कंत्राटदार नेमण्यात येऊन काम सुरू करण्यात आले आहे. परंतु पाणी साठवण विहिरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पाणी टाकी बनवण्यासाठी ग्रामपंचायतने नेमून दिलेल्या जागी सरपंचांना न विचारणा करता कंत्राटदाराने पाणी टाकीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे, त्याला लागूनच लहान मुलांची अंगणवाडी, व प्राथमिक शाळा असून खोदकाम करून ठेवलेल्या खड्ड्यात अंदाजे दहा फुटापर्यंत पाणी साचून आहे, अंगणवाडीतील लहान मुलांना तसेच प्राथमिक शाळेतील मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतकेच नव्हे तर सदर कंत्राट दराने सरपंच व ग्रामपंचायत यांना विचारणा न करता पाणी टाकी बनवण्या अगोदरच पाईप लाईन चे खोदकाम सिमेंट काँक्रेट रोड मधोमध फोडून ग्रामपंचायत रोडची दुरावस्था केलेली आहे, तसेच अंतर्गत नालीची सुद्धा दुरावस्था केलेली आहे, सदर कामाबद्दल पाणीपुरवठ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत विचारणा केली असता, पाईपलाईनचे खोदकाम करण्याचे काम आम्ही सांगितलेले नाही, असे उत्तर मिळाले, परंतु कंत्राटदाराने स्व मर्जीने, गावातील सिमेंट काँक्रीट रोड मधोमध फोडून ग्रामपंचायतीचे नुकसान केलेली आहे, सदर पाईपलाईन सिमेंट काँक्रेट रोड फोडून मधोमध टाकू नये व दुरावस्था झालेल्या सिमेंट काँक्रेट रोडची कंत्राटदाराने दुरुस्ती करून देण्यात यावी, अन्यथा सदर पाणी टाकीचे काम करू देणार नाही अशी भूमिका लालहेटी येथील जागृत नागरिक तसेच ग्रामपंचायत ने घेतलेली आहे.

करिता पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून कंत्राट दाराकडून लालहेटी घोसरी येथील पाणी टाकीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.