“मासिक पाळी व्यवस्थापन” आणि ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन ..

260

दिनांक 7/11/ 2023 ला होप फाउंडेशन सिरोंचा जिल्हा गडचिरोली च्या वतीने स्वामी विवेकानंद विद्यालय भद्रावती येथे “मासिक पाळी व्यवस्थापन”आणि” ताण तणाव व्यवस्थापन “या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी होप फाउंडेशन सिरोंचा ची स्वयंसेविका प्रतिक्षा दुपारे यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना मासिक पाळी होणे काही वाईट बाब नसून ती एक नैसर्गिक बाब आहे असे सांगितले, पाळी दरम्यान धावणे किंवा व्यायाम करणे वाईट नाही खेळामध्ये पण सहभागी होऊ शकतात, पाळी दरम्यान सकस आहार घ्यावे लोहयुक्त आहार घेणे गरजेचे आहे विटाळाची कल्पनाही गैरसमज असून, लोणचं खराब होणे या गोष्टी पण अर्थहीन आहेत म्हणून अशा गोष्टीवर विश्वास न ठेवता मासिक पाळी बद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्याचा प्रचार करू असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच किशोरवयीन मुलीना ताण तणाव व्यवस्थापन बद्दल माहिती देण्यात आली. ताणाचे दोन प्रकार असून एक सकारात्मक ताण आणि एक नकारात्मक ताण असतो. सकारात्मक ताण असेल त्यातून सकारात्मक गोष्टी घडून येतात पण नकारात्मक ताण मधून अनेक शारीरिक आजार आणि मानसिक आजार होत असतात त्यामुळे ताण विरहित जीवन व्यतित करा असे मार्गदर्शन केले. ताण येत असेल तर गाणे म्हणणे,नृत्य करणे, संगीत ऐकणे, फिरायला जाणे, बागकाम करणे, अश्या छंद जोपासा असे मार्गदर्शन केले. मनातील भावना तज समुपदेशक आणि मनोविकार तज कडे व्यक्त करा असे मार्गदर्शन करून संवाद साधून हा कार्यक्रम संपविण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक- अनिल ढवस, सहायक शिक्षिका-आशा मत्ते, शिक्षक- दयाकर मगेडवार , शिक्षक-तुकाराम पोपडे, शिक्षक पुरुषोत्तम श्रीरामे शिक्षक-संजय आगलावे, कनिष्ठ लिपिक- विनोद गावंडे व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमाला सहयोग दिला.