वंचित उपेक्षिता साठी दिवाळ फराळ व साहित्य वितरण..

288

चंद्रपूर – स्थानिक विकलांग सेवा संस्था संचलित तुकूम परिसरातील शिवभोजन केंद्रात आलेल्या भोजन लाभार्थी व परिसरातील गरजू ना शिवप्रभा चारिटेबल ट्रस्ट द्वारा दीपावली फराळ पाकिटाचे वितरण तसेच पालक मंत्री नामदार श्री मुनगंटीवार द्वारा उपलब्ध करुन दिलेल्या वंदे मातरम संदेश असणाऱ्या कापडी पिशव्या, सुगंधित उटणे, दिवणाल व भाजीविक्रेत्यांना चर्मकार बांधवाना मोठ्या छत्रीचे वितरण करण्यात आले.
वंचित, उपेक्षित आणि गरजू साठी असलेल्या ह्या विधायक उपक्रमाला शिवप्रभा ट्रस्ट चे अमोल साइनवार, नरवडे, ह्यांनी दिलेल्या सहयोगाबद्दल विक लांग सेवा संस्थेच्या वतीने श्री देवराव कोंडेकर, प्रसाद पा न्हेरकर ह्यांनी विशेष आभार मानलेले असून ह्या उपक्रमाला नितीन राव, राजश्री शिंदे, सीमा दुपारे, शिवानी बोबडे खुशाल ठलाल ह्यांनी मौलिक सहयोग दिला.