वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धा व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न..

583

चंद्रपूर: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन समाज सेवक श्री.राहुल भाऊ देवतळे व मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक 18 व 19 ला स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड इथे करण्यात आले होते.भजन स्पर्धेमध्ये एकूण 26 महिला व पुरुष भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये प्रथम क्रमांक पुरुष गट राजर्षी शाहू महाराज भजन मंडळ दहेली यांनी पटकाविला,द्वितीय क्रमांक संत कृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर,तृतीय क्रमांक तेजस्विनी महिला भजन मंडळ संजय नगर चंद्रपूर यांनी पटकाविला.तसेच राहुल भाऊ देवतळे व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला उपक्रम म्हणजे गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम.सायकल वाटप कार्यक्रमामुळे समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम त्यांनी व मित्र परिवार यांनी केलेले आहे. भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण व सायकल वाटप वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले विठ्ठल व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री.धन्नाभाऊ येरेवार ,उद्घाटक म्हणून बिंदुभाऊ बडकेलवार अध्यक्ष विठ्ठल रुखमाई ज्येष्ठ नागरिक कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते शिवा भाऊ कोरवा,परीक्षक राजेंद्र भाऊ आकरे हे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेणारे विठ्ठल व्यायाम शाळेचे अरुण भाऊ गर्गेलवार,अनिल भाऊ दळवे, संजू भाऊ जिझिलवार,श्री.मधुकर श्रीरामे,श्री सुधाकर गर्गेलवार,श्री.सुहास पिंगे,श्री.किशोर भाऊ वैद्य, श्री.वसंत पवार हे होते.कार्यक्रमाचे संचालन अनीलभाऊ गर्गेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.दादाजी नंदनवार यांनी केले..