गोंडपिपरी: श्री.साई क्रीडा मंडळ चेकलिखितवाडाच्या वतीने तिन दिवसीय पुरुषांचे कब्बडी सामन्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन भाषणात संबोधित करताना कब्बडी हा खेळ आपल्या मातीशी संलग्न असुन खेळ हा सांकेतिक आहे. प्रत्येक क्षेत्रात यश अपयश असतेच.अपयश ही यशाची खरी पायरी आहे. त्यामुळे खेळाडूंनी सांकेतिक खेळ खेळत आपले कौशल्य दाखवायचे आहे..
कबड्डी खेळातून बौद्धिक क्षमता विकसित होते. कलागुणांना वाव मिळतो. आरोग्य तंदुरुस्त बनते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वही करायला मिळते. सर्व कबड्डी संघांनी उत्तमरीत्या आपल्या क्रिडाकौशल्याचे प्रदर्शन करावे. प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करावा. विजयाकरीता सर्वांनाच शुभेच्छा ! ! असे प्रतिपादन याप्रसंगी माजी आमदार संजय धोटे यांनी उद्घाटनिय भाषणात बोलताना केले.
यावेळी सहउदघाटक , नगरसेवक चेतनसिंह गौर , अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार , कुउबास गोंडपिंपरीचे संचालक महेंद्रसिंग चंदेल, ग्रामपंचायत सदस्य, सहसंयोजक सौ.कोमल फरकडे , भाजपाचे नेते दिपकराव बोगिनवार चेकलिखितवाडा प्रथम नागरिक सरपंच सौ.पुष्षा राऊत , प्रशांत येल्लेवार , कुउबास संचालक सदिप पौहणकर, कृषी बाजार सदस्य , हरिदास मडावी, प्रभाकर कोहपरे , प्रतिमा चंद्रगिरीवार, भाग्यश्री आदे,विनोद आदे., सौ.रेखा कोहपरे, वामणराव गेडाम ,रविन्द्र पाल यांचेसह गावातील नागरिक , क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.