मनुवाद्यामुळे संविधानाला दिव्यांगाचे स्वरूप.. –प्रा. जावेद पाशा

467

– वर्तमानात संविधान निकामी असल्याचा दिखावा; असविधानिक कामाला दुजोरा
– समता सैनिक दलातर्फे संविधानाला मानवंदना
– मानवतावादी विचार प्रबोधिनी द्वारा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न

गोंडपिपरी :– संविधानातील समतावादी मूल्यांना झुगारून विषमता निर्माण करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभी झाल्याने संविधानाला दिव्यांगाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे मत गोंडपिपरीत झालेल्या संविधान दीन समारोहात मार्गदर्शन करताना प्रा. जावेद पाशा यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त असे की,
मानवतावादी विचार प्रबोधिनी गोंडपिपरी द्वारा आयोजित संविधान दिन समारोह साजरा करण्यात आला 26 नोव्हेंबर रोजी मातृत्व संघटन समता सैनिक दल यांच्या शिस्तप्रिय पथसंचलनासह मोठ्या संख्येने मार्च काढण्यात आला. गांधी चौक गोंडपिपरी येथे संविधानाची प्रस्तावना वाचून पंचशील बुद्ध विहारातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. जिल्हा संघटक निवारण कांबळे,मार्शल राजू झाडे यांच्या मार्गदर्शनात तालुका संघटक व सह संघटक यांच्या सहकार्याने संविधान अभिवादन मार्च पार पडले.

27 नोव्हेंबर प्रबोधन कार्यक्रमात बोलताना प्रा. जावेद पाशा म्हणाले..
संविधानाची खरी सुरुवात 1932 पासूनच डॉ.आंबेडकरांनी केली सायमन कमिशन, आणि गोलमेज परिषदेत बहुजनांचे हक्क आणि अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक अडचणीतून मसुदा समिती अध्यक्षपदी निवड झाली. सात संख्येच्या मसुदा समितीत एकट्या बाबासाहेबांनी संविधान 141 दिवसात पूर्ण केले. त्यावरील चर्चा आणि सहमती यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. कलम 340 ओबीसींच्या आरक्षणासाठी आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.

देशात अशी परिस्थिती निर्माण करायची की भारताचे संविधान कूचकामी आहे न्याय देण्यास सक्षम नाही अशावेळी संविधान बदलण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होईल आणि मनुवादी विचारसरणीचा मार्ग मोकळा होईल. संविधान दिनानिमित्त प्रा.जावेद पाशा यांनी भारतीय नागरिकांना सजग केले असून समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं अशी आशा यावेळी व्यक्त केली.
मानवतावादी विचार प्रबोधिनी द्वारा, मुख्य मार्गदर्शक प्रा. जावेद पाशा, कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराव माऊलीकर निवृत्त गटविकास अधिकारी, उद्घाटक विनोद चांदेकर त्रिमूर्ती भाई भाई चीवंडा, सहउद्घाटक मोरेश्वर सुरकर अध्यक्ष ओबीसी कृती समिती, स्वागताध्यक्ष प्रवीण भसारकर, उद्धव नारनवरे आंबेडकरी विचारवंत, रूपचंद फुललेले वैध मापण अधिकारी गडचिरोली, शुभम बहाकर तहसीलदार गोंडपिपरी, ॲड.दीपक चटक आंतरराष्ट्रीय स्कॉलर, महेंद्रसिंग चंदेल संचालक तथा नगरसेवक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शेखर दहिवले, प्रस्तावना रुपेश निमसरकार, आभार सुनील रामटेके यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.