महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पालडोह येथे साजरा.

420

जिवती: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह जिल्ह्यातील 365 दिवस चालणारी शाळा या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. आज या शाळेत महापरिनिर्वाण दिन याचे औचित्य साधून बालसभा पार पडली.महात्मा जोतिबा फुले यांची जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता 6वी च्या मुलांना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिले.मुलानी नियोजनबध्द काम करत ही बालसभा शाळेत आयोजित केली.

या प्रसंगी शाळेतील मंत्रिमंडळ यांना पुढाकार देऊन या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्यमंत्री कु दिव्यांका बाजगिर व उदघाटक उपमुख्यमंत्री सुरज कणकावरे याला दिले.तर प्रमुख पाहुणे सांस्कृतिक मंत्री,आरोग्य मंत्री,स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री, धान्यपुरवठा मंत्री,क्रीडा मंत्री यांनी स्थान ग्रहण करत बालसभा पार पडली.
जिल्हा परिषद पालडोह येथील महापरिनिर्वाण दिन साजरा करत राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती देत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 45 मुलानी मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतून मार्गदर्शन केले. लहान मुलांनी व्यासपीठावर येऊन सुंदर रित्या माहिती सांगत स्वतःचा आत्मविश्वास वाढवत मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी यांनी मुलांना या कार्यक्रमाचे नियोजन सोपवून ही बालसभा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. सर्वात शेवटी मुलांना मार्गदर्शन करत या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक परतेकी सर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 6 वी च्या कु कावेरी राउत्तवाड व राणी राऊत यांनी केले.