राजुरा: तालुक्यातील नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल वरुर रोड येथे आज 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी चिमुकल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी तेलंग , श्रद्धा गेडाम, कोमल वानखेडे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.