चंद्रपूरचे सी.ई.ओ.विवेक जॉन्सन यांनी घेतली हिवरा ग्रामपंचायतीची भेट…भेटी दरम्यान जाणून घेतल्या गावातील विविध समस्या..

646

गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन साहेबांनी आज दिनांक ७ डिसेंबर रोजी गोंडपिपरी तालुका दौरा केला. दौऱ्या दरम्यान मौजा हिवरा येथे आगमन करत गावातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, व ग्रामपंचायतीला भेट दिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांशी हितगुज करत सीईओ साहेबांनी लहान लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोबतच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तेथील आवश्यक औषध साठा व गावातील आरोग्य विषयक अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान जिल्हा परिषद शाळेपासून मोरेश्वर पुलगमकर यांचे घरापर्यंत मंजूर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सीईओ साहेबांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर ग्रामपंचायत हिवराचे सभागृहात बैठक घेऊन गावातील अत्यावश्यक अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान गावात वाचनालय, अंगणवाडी इमारत, प्राथमिक शाळेत आठवीपर्यंत वर्ग असून तीन शिक्षकांची कमतरता असल्याने कायमस्वरूपी तीन शिक्षकांची अत्यावश्यकता, दलित वस्ती निधी मंजूर करणे, 15 वित्त निधी मंजूर करणे , ग्रामपंचायत भवन बांधकाम, नवीन शालेय इमारत बांधकाम असे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याकरिता ग्रामपंचायतीकडून निवेदने देण्यात आली.पैकी काही विकास कामाकरिता लवकरच निधी मंजूर करू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

यावेळी गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, गट शिक्षणाधिकारी भसारकर, बालविकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी, पंचायत विस्तार अधिकारी प्रधान, विविध विभागाचे विस्तार अधिकारी,सरपंच निलेश पुलगमकर, उपसरपंच वर्षा कुत्तरमारे, सदस्य जितेंद्र गोहणे,सदस्य देवानंद आकेवार सदस्य प्रतिमा आक्केवार,सदस्य पुष्पा हिवरकर, सदस्य अरुणा नेवारे, ग्रामसेवक राऊत, ऑपरेटर उमेश पुलगमकर, शिपाई विद्या गुंडावार, चेतन पूलगमकर, रोजगार सेवक भिवसण चहारे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचारी, गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.