गोंडपिपरी: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती गोंडपिपरीच्या वतीने विविध मागण्या घेत गोंडपिपरी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे दि ८ (शुक्रवारी) १४२ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार शुभम बहाकर यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
दुष्काळसदृश्य तालुक्यात असलेल्या अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषित बालके व गरोदर महिला यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार याच्यावर या संपाचा परिणाम जाणवला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांच्या प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन दिले होते. परंतु त्यांच्या मागण्यावर कोणताही निर्णय न झाल्याने चार डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले.या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आपिला मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ ते २६ हजारापर्यंत असावे. सेविका व मदतनिसांच्या मानधनात १०० ला ७५ असे प्रमाण असावे. मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.
अंगणवाड्यांसाठी किमान रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा. या मागण्या केल्या.दि १५ नागपुरात ठीय्या आंदोलन करनार असल्याची माहिती मंगला झाडे, मालंद धाबरडे,इंदिरा चणकापूरे,दिपाली मुंजनकर,प्रतिभा रामटेके,कुसुम खामनकर,मंदा चौधरी, अंजना झाड़े,मोहिनी कानकाटे यांनी सांगितले.