संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त गरजूंना वस्त्र वाटप…

170

चंद्रपूर – महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या  स्मृतिदिनानिमित्त गरजू व्यक्तींना वस्त्रांचे वितरण करण्यात आले. हे वस्त्र  वितरण विकलांग सेवा संस्थेचे पदाधिकारी, शिवभोजन केंद्राचे लाभार्थी यांना करून संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे.तसेच त्यांच्या विचारांवर,कार्यावर कृती करणे गरजेचे आहे. अशी माहिती नितीन राव यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या  यशस्वीततेसाठी देवराव कोंडेकर, प्रसाद पान्हेरकर, राजश्री शिंदे अश्विनी कंन्नाके, शिवानी बोबडे, सीमा दुपारे इत्यादींनी मोलाचे सहकार्य दिले.