सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी स्वच्छता रॅलीने केली जनजागृती… संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रमदान व अभिवादन कार्यक्रम

240

चंद्रपूर – स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर च्या वतीने झाडूने परिसर व किर्तनाने मन साफ करणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रमदान करण्यात आले, रॅलीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन प्रतीमेला व विचाराना अभिवादन करण्यात आले.

गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांत भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

प्राचार्य (प्रभारी) डॉ. जयश्री कापसे म्हणाल्या स्वच्छता हि एक सवय आहे. हि सवय लागण्यासाठी आपल्याला मनापासून तयारी करावी लागते. पण याची सुरुवात करणारे संत गाडगेबाबा होते. आपल्याला स्वच्छतेचे अनुसरण करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ राठोड व प्रा. नितिन रामटेके यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व समाजकार्य विद्यार्थी उपस्थित होते.