स्वच्छ्ता ही सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टिक कचरा जमा करताना स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते.

335

चंद्रपूर:  येथील स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘स्वच्छ्ता ही सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. प्लास्टिक कचरा साचल्याने वातावरणाची आणि निसर्गाची प्रचंड हानी करत आहे, हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत आष्टनकर यांनी केले. हे अभियान अंचलेश्वर किल्ला व मंदीर परिसर येथे करण्यात आले. परिसरातील प्लास्टिक कचरा महानगरपालिकेच्या कचरा गाडीमध्ये वर्गीकृत करून टाकण्यात आला. यासाठी संघटनेचे तालुका प्रमुख रोशन आस्टुनकर, शहर प्रमुख करीना बोपचे, कोषप्रमुख अपेक्षा भालेराव, पर्यावरण प्रमुख अभिषेक गुज्जनवार, सागर देव, दिप्ती खोब्रागडे, अंकित पांडे, ऋतुजा जमदाडे व परिसरातील सामान्य नागरीक यांनी उपस्थीत राहुन श्रमदान केले.