काँग्रेसच्या तालुका युवक कार्याध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड

423

जिवती (ता.प्र.) : जिवती काँग्रेसच्या वतीने जिवतीयेथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिवती काँग्रेसच्या युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल शंकरजी कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याप्रसंगी अभिजित धोटे, उमेश गोनेलवार, अशपाक शेख, माधव डोईफोडे, नंदाताई मुसने, अजगरअली शेख, ताज्जूद्दीन शेख, शब्बीर पठाण, प्रेमदास राठोड, देविदास साबने, माधव शेमबळे, बसवराज रावनकोळे, परशुराम पांचाळ, वैजनाथ गंगणार, लहू गोतावळे, सुनील शेळके, अभिषेक मस्कले यासह युवक काँग्रेसचे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. यापुढेही त्याच ताकदीने, एकजुटीने जनसेवा व जनसंपर्क करण्याचे आवाहन केले. तर अभिजित धोटे यांनी काँग्रेसचे नेतृत्व लोकशाही प्रधान असून पक्षाने नेहमीच सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना संधी दिली आहे. जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जनतेच्या भल्यासाठी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन लहू गोतावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश शेटकर यांनी केले.