प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)९५४५६०५१७१
आल्लापल्ली :- इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल ही अतिशय कमी वेळात नाव रूपाला आलेली इंग्रजी माध्यमाची शाळा असून शाळेचे मुख्याध्यापक श्री स्वरूप गावडे सर वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून मुलांना प्रोत्साहित करीत असतात.
मागील तीन दिवसापासून इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आले .अगदी बाल वयात व्यवसायाचे सूत्र अवगत व्हावे या उद्देशाने बाल विद्यार्थ्यांना खरी कमाईचे धडे गिरवण्यासाठी इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल येथे 30 डिसेंबर रोज शनिवारला आनंद मिळावा उत्साहात घेण्यात आला या आनंद मेळाव्याचे उद्घाटक म्हणून पत्रु जे नरोटे शिकायत निवारण अधिकारी आलापल्ली व अध्यक्ष म्हणून हेमंत गजभिये सीएम क्लब मेंबर आल्लापल्ली व प्रमुख पाहुणे म्हणून अमित येनपरेडडीवर उपाध्यक्ष इन्स्पायर बहुउद्देशीय विकास संस्था अल्लापल्ली उपस्थित होते.
मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव यावा तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला यामध्ये चिमुकल्यांनी विविध खाऊचे स्टॉल लावून खाऊची विक्री केली विद्यार्थ्यांनी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या खाऊचा मनमुराद आनंद घेतला या मेळाव्याचे संचलन पूजा येरमे तर आभार अश्विनी सोनटक्के यांनी केले आणि सारिका ताकलवार यांनी सहकार्य केले यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते