कोरपना: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. रणजीत यादव तहसीलदार कोरपना माननीय श्री. सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा माननीय श्री विलास देवाळकर बीट विस्तार अधिकारी माननीय श्री मुकेश निमकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय सौ प्रियंका उरकुडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माननीय श्री सुदर्शन डवरे उपसरपंच वडगाव माननीय कुमारी कलावती मडावी पोलीस पाटील वडगाव माननीय श्री श्रीराम भोंगळे अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती वडगाव आज दिनांक 3 जानेवारी 2024 ला पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार श्री रणजीत यादव हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली . कला मंदिर सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी प्रतिमापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर प्रमुख पाहुणे शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. यावेळी तहसीलदार श्री यादव यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला व त्यांचे शिक्षण देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या बालपणीचे अनेक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. विद्यार्थ्यांना देखील उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन केले .तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पंचायत समिती कोरपणाचे गटशिक्षणाधिकारी श्री सचिन कुमार मालवी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. शाळेबद्दल देखील त्यांनी अनेक सकारात्मक गोष्टी बदल झाल्याचे स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बीट विस्ताराधिकारी श्री विलास देवाळकर यांनी देखील विद्यार्थ्यांची संवाद साधला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा इतिहास मुलांच्या समोर मांडला. या कार्यक्रमाला आपल्या प्रस्ताविकातून शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सखाराम परचाके यांनी पीएम श्री योजनेतील शाळेच्या कार्य वृत्ताची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा उपस्थित पाहुण्यांच्या व पालकांच्या समोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार श्री नितीन जुल्मे यांनी केले. यशस्वीतेकरीता श्री. शिवाजी माने कु. पुष्पा इरपाते श्री. अनिल राठोड यांनी सहकार्य केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कैलास मेश्राम शंकर पिंगे गुलाब निमकर प्रकाश शेडमाके शेवंतीका अस्वले मालती पावडे शारदा गुरनुले दीपक ताजणे प्रभाकर ताजने प्रमोद कुळमेथे अरुण गोहकर प्रभाकर शेंडे जगन्नाथ वसाके श्रीराम शेंडे पतृ गुरनुले शशिकांत निखाडे ज्ञानेश्वर परसुटकर प्रियंका निखाडे युगंधरा निखाडे मारुती चौधरी मोरेश्वर ढवळे दादाजी शेंडे पुंडलिक उरकुडे देविदास शेंडे वामन शेंडे नथूजी मोहरले शांताबाई सोनपित्रे किरण सोनपित्रे पुष्पा मेश्राम अशा मेश्राम व सर्व विद्यार्थी गावकरी माता-भगिनी उपस्थित होत्या.