विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते सिंदेवाही तालुक्यात 11 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन.. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, धुमनखेडा, नाचनभट्टी, पेंढरी गावांचा समावेश

443

सिंदेवाही: राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू केला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सिंदेवाही तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या नवरगाव, धुमनखेडा, नाचनभट्टी, पेंढरी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

या भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये नाचनभट्टी येथे 15 लाख रुपयांच्या समाजभवनाचे बांधकाम, धुमनखेडा नवरगाव येथे जिल्हा वार्षिक योजनेतून 4 कोटी रुपयांच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम करणे, धुमनखेडा येथे मानकादेवी मंदिराजवळ 20 लाख रुपयांच्या सभागृहाचे बांधकाम करणे, रत्नापुर फाटा ते कृषी उत्पन्न बाजार समिती नवरगाव पर्यंत 350 लाख रुपयांच्या निधीतून डांबरीकरण करणे, नवरगाव-चिमुर रस्त्यावरील घोडाझरी कालव्यावरील पुलाचे 250 लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम करणे, पेंढरी येथे 30 लाख रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे अशा एकूण
सुमारे 11 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भुमीपूजनाचा यामध्ये समावेश आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गावांतील नागरिकांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे निराकरण व गावातील पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत विकास आराखडा देखील तयार केला. देश व राज्य विकासाचा मुळ कणा असलेल्या ग्राम खेड्यातील समस्यांना जेव्हा पूर्ण विराम देऊ तेव्हाच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास व प्रगती साधता येईल असा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, नवरगाव येथील सरपंच राहुल बोडणे, नवरगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुशांत बोडणे, नगरसेवक युनुस शेख, माजी पं.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, माजी पं.स. सदस्य चंद्रकांत शिंदे, नाचनभट्टी सरपंच विद्या खोब्रागडे, ग्राम.पं.सदस्य परमानंद चहांदे, ग्रा.पं.सदस्य दिलखुश खोब्रागडे, पेंढरी सरपंच राऊत, उपसरपंच निशिकांत शिंदे, राजाराम चौके, कार्तिक बन्सोड, संतोष चौके यांसह संबंधित गावातील काॅंग्रेस कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.