नांदगाव येथे सावित्रीमाई फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर,  समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

780

नांदगाव :- माळी समाज नांदगाव यांच्यातर्फे दिनांक 2/1/ 2024 ला सावित्री माई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला, या रक्तदान शिबिरात नांदगाव घोसरी परिसरातील युवकांनी रक्तदान करून उस्फूर्त प्रतिसाद दिला. तीस युवकांनी रक्तदान करून सावित्री माई फुले यांची जयंतीसाजरी केली,तसेच सायंकाळी 8:00 वाजता भव्य समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित, विदर्भाची मुलुख मैदान तोफ डॉक्टर समीर दादा कदम यांच्या सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात महिलांचीउपस्थिती होती, त्याचप्रमाणे मंचावर, श्रीकांत शेंडे, पोंभुर्णा, श्री. मेश्राम वनरक्षक, तसेच शालेय चिमुकल्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.डॉ. समीर कदम सर यांनी सांगितले की, महिलांनी सावित्री माई चे आदर्श व विचार अंगीकारून आपली प्रगती करावी, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा रुढी परंपरा व्रत उपवास ह्या ज्या महिलांच्या अंगी असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा झुगारून शिक्षणाची कास धरावी, बहुजन समाजातील सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित व्हावे तेव्हाच महिलांची खरी प्रगती होईल, महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करावा असे प्रतिपादन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे फॅन्स क्लब नांदगाव येथील सर्व युवकांनी मोलाचे सहकार्य केले, विशेष करून या कार्यक्रमासाठी स्वप्निल पगडपल्लीवार, महेंद्र ढोले माळी समाज अध्यक्ष नांदगाव, गंगाधर मोहुर्ले, उपाध्यक्ष माळी समाज, प्रवीण मोहुर्ले, तसेच सर्व युवकांनी रक्तदान शिबिर व समाज प्रबोधन कार्यक्रम यशस्वी केले.
समाज प्रबोधन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आकाश बांबोडे यांनी केले.