किरमिरी येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी..

404

गोंडपीपरी: तालुक्यातील वर्धा नदीकाठी वसलेल्या किरमिरी या छोट्याशा गावात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आम्रपाली महिला सक्ष्मीकरण समिती तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

स्त्री सक्षमीकरण करण्याकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात गोंडपिपरी येथील जनता विद्यालयात शिकणारा आयुष् राऊत यांनी चार गाण्यावर सुंदर नृत्य करून प्रेक्षकांनी मने जिंकली.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ऍड.सौ.अरुना जांभूळकर यांनी महिला ही पुरुषाच्या तुलनेत अधिक सक्षम आहे असे मत मांडले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.वैष्णवीताई बोडलावर यांनी विद्यमान केंद्र सरकार स्त्रीयांसाठी विविध योजना राबवून स्त्रियांना जास्त गतिमान करण्यास उत्तेजन करीत आहेत असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून मा जि.प.सदस्य सौ वैष्णवीताई अमर बोडलावार ,तर अध्यक्षस्थानी ॲड अरूणाताई जांभूळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूनिताताई सोनवणे,किरण डोंगरे,ताई निखाडे, सुमित्रा पेरगुडवार,प्रतिमा झाडे, गिरडकर सर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरमिरी गावच्या उपसरपंच सौ स्वीटीताई मोहन डोंगरे यांनी केले.