विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते सावली तालुक्यात 2 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन सावली तालुक्यातील सायखेडा, उसरपार, पालेबारसा, जनकापुर गावांचा समावेश

261

सावली: राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू केला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सिंदेवाही तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या नवरगाव, धुमनखेडा, नाचनभट्टी, पेंढरी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

या भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकास कामांमध्ये जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजना अंतर्गत पालेबारसा ते जनकापुर तुकुम रस्ता ग्रामीण मार्ग मजबुतीकरण 30 लक्ष रुपये, सायखेडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रोड 21 लक्ष रुपये चे लोकार्पण , जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत सायखेडा ते जनकापूर ग्रामीण मार्ग 6 मातीकाम व खडीकरण चे भूमिपूजन किंमत 20 लक्ष, पालेभाषा येथे खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे लोकार्पण किंमत 8 लक्ष , पालेबरसा येथे लेखाशीर्ष 2515 अंतर्गत सिमेंट काँग्रेस रोड किंमत 10 लक्ष रुपयाचे भूमिपूजन, उसर पार तुकून येथे जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत उसरपार ते मेहबूज ग्रामीण मार्ग 11 व मोरी बांधकामचे भूमिपूजन अंदाजे किंमत 15 लक्ष, उसरपार (तू ) ते मेहाबूज ग्रामीण मार्ग 10 मजबुती व डांबरीकरण करणे बांधकामाचे भूमिपूजन अंदाजे २० लक्ष रुपये , ग्रामीण मार्ग 10 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजे किंमत 20 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, खानापूर फाटा विशेष दुरुस्ती 30 54 योजनेअंतर्गत भानापूर- उसरपार- मेहा बूज रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण अंदाजे किंमत 60 लक्ष बांधकामाचे भूमिपूजन , पाथरी येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ सभागृह बांधकाम अंदाजे किंमत 15 लक्ष बांधकामाची भूमिपूजन अशा 2.19 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भुमीपूजनाचा व लोकार्पणाचा यामध्ये समावेश आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गावांतील नागरिकांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे निराकरण व गावातील पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत विकास आराखडा देखील तयार केला. देश व राज्य विकासाचा मुळ कणा असलेल्या ग्राम खेड्यातील समस्यांना जेव्हा पूर्ण विराम देऊ तेव्हाच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास व प्रगती साधता येईल असा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका काँग्रेस सावली अध्यक्ष उषा भोयर, निखिल सुरमवार, आशिष मनबत्तुलवार, खुशाल लोढे, वैभव गुज्जनवार, यांसह संबंधित गावातील काॅंग्रेस कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.