काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात श्रीनिवास कंदनरिवर यांचा वाढदिवस  साजरा वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्याना फळांचे वाटप….

169

गोंडपिपरी: येथील पंचायत समितीचे माजी सदस्य तथा तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवासजी कंदनुरिवार यांचा वाढदिवस गोंडपिपरी येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिलभाऊ झाडे यांचा सुद्धा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

श्रीनिवास कंदनुरीवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जन्मदिनाचे औचित्य साधून व सलोख्याचे हित जोपासत गोंडपिपरी येथील मूकबधिर विद्यालयाची भेट घेतली. व मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून त्या लहान लहान बालकांकडून आशीर्वाद घेतला.
यावेळी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष तथा संचालक निलेश संगमवार, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, बा.स.संचालक तथा सरपंच देविदास सातपुते,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,नगरसेवक सचिन चिंतावार, शहराध्यक्ष राजू झाडे, नगरसेवक वनिता वाघाडे, वनिता देवगडे, माजी संचालक शंभूजी येलेकर, सरपंच राजू राऊत,सेवा सो.माजी अध्यक्ष अनिल झाडे,तुकेश वानोडे,प.स.माजी सदस्य श्रीनिवास कंदनुरिवार,ता.उपाध्यक्ष नितेश मेश्राम, अनु.जा.ज.माजी अध्यक्ष गौतम झाडे,काँग्रेस कार्यकर्ते बबलू कुळमेथे, वैभव निमगडे,शुभम पिंपळकर, यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि मूकबधिर विद्यालयातील शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

धन्यवाद..!