अखेर त्या जीवघेण्या विद्युत तारा हटविल्या. राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ देवतळे यांच्या प्रयत्नांना यश.

273

चंद्रपूर:-  स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील मजदुर चौक ते मारपीट चौक इथे अनेक वर्षांपासून लोकांच्या घरावरून गेलेला विद्युत प्रवाह जीवघेणा ठरत होता.ही माहिती राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ देवतळे यांना स्थानिक लोकांनी दिली.राहुल भाऊ देवतळे यांनी क्षणाचाही विलंब न करता विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.तब्बल एक वर्षाच्या अथक परिश्रमाने शेवटी तेथील जीवघेण्या विद्युत तारा हटविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ देवतळे यांना यश मिळाले.व स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहे…