नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात निखिल भडके ची निवड…

345

चंद्रपूर :- नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात चंद्रपूर येथील सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालयचा विद्यार्थी निखिल राजकपूर भडके यांची निवड नेहरू युवा केंद्र चंद्रपूर यांच्या तर्फे करण्यात आली.

दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत युवा महोत्सवाचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हातून श्री. निखिल भडके. कु. राधिका दोरखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि संपूर्ण देशभरातून 22 हजार विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत. दिनांक 12 जानेवारी ला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

निखिल ची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयश्री कापसे मॅडम आणि सर्व प्राध्यापक वृंद निखिल चे अभिनंदन करीत आहेत