मराठी पत्रकार दिनानिमित्त जिवती येथे पत्रकारांचा सत्कार

413

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिवती येथील मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख देवरावभाऊ भोंगळे यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकार दिपक साबने, शंकर चव्हाण, लक्ष्मण मंगाम, सुग्रीव गोतावळे, शबीर जहागीरदार, प्रीतम दुर्गे, शेख सलीम, जमालू शेख, शेख फारुख, संतोष इंद्राळे, गोविंद गोरे, प्रशांत मोरे, श्रीकांत राजपंगे, क्रिष्णा चव्हाण, अनवर खान, शेख हकानी, बळीराम काळे आदी पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

जगभरात घडलेला प्रत्येक घटनाक्रम हेरून तो देशभर पसरलेल्या नागरीकांना रात्रंदिवस घरबसल्या टिव्ही, वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकार बांधवाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आजपर्यंत झालेल्या पत्रकारकारितेमध्ये झालेल्या बदलाविषयी माहिती देत कार्यक्रमाला जमलेल्या पत्रकार बांधवाना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी विविध विषयांवर देवरावभाऊ भोंगळे यांनी संवाद साधला.

यावेळी विधानसभा प्रमुख देवराव भाऊ भोंगळे, तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे,भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, दत्ता राठोड, तुकाराम वारलवाड, मारोती बेल्लाळे, पुंडलिक गिरमाजी, कमलाकर जाधव, किशोर चांदूरे, मुनिर सय्यद, संतोष जाधव, तानुबाई मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.