चंद्रपूर: जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले.
सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज नायलॉन मांजाचा बेकायदेशीर वापर इतका वाढला आहे की, त्यामुळे पाईचाऱ्यांनाच दुखापतींना सामोरे जावे लागत आहे, शिवाय पक्ष्यांनाही अनेकदा जीव गमवावा लागतो. या संदर्भात चंद्रपूर शहरात जनजागृतीसह चंद्रपूर काँग्रेस कमिटीचे पर्यावरण जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील यांना निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी एजाज खान, परवेज शेख, अखिलेश जनबंधू, शारिक भाई आदी उपस्थित होते.