गडचांदूर: प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे सर यांनी दोन्ही प्रतिमेना पुष्पहार अर्पण केले.यावेळी प्राध्यापिका मनीषा मारस्कोल्हे यांनी राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राला शुरविर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पुत्राला जन्म दिला.असे सांगत सर्वधर्मसमभाव आणि परस्त्री मातेसमान अशी शिकवण शिवाजी महाराजांना दिली.
आजच्या मुलींनी जिजा मातेची प्रेरणा अंगीकारावी असे सांगत आजच्या तरुण पिढीने स्वामी विवेकानंद यांचे गुण अंगीकारावे व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण जगाचे मार्गदर्शक ठरतात असे त्यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे सरांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे आदर्श आणि मूल्यांची आजच्या युवा पिढीला असलेली गरज याविषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी पांडव हिने केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अरविंद मुसने सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एजाज शेख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राहुल ठोंबरे, प्रा. सचिन धनवलकर, प्रा. श्रीकांत घोरपडे, कु.रोशनी खाते, गजानन रामभारती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन माधुरी बावणे यांनी तर आभार धनश्री चतुरकर हिने मानले.