केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत माराई पाटण शाळेतील विद्यार्थी अव्वल

484

जिवती (ता.प्र.) : केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा केंद्र टेकामांडवा अंतर्गत जि.प.उ.प्रा.शाळा चिखली खुर्द येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ ला झालेल्या स्पर्धेत जि.प.उ. प्रा.शाळा माराई पाटणच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत प्राथमिक गटात सुहाशी बळीराम काळेनी बुद्धिमापन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला, गुंजन चंद्रकांत सोनकांबळे स्मरणशक्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक, अंजली राहुल लव्हराळे स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर उच्च प्राथमिक गटात तमन्ना मोहन टोंपे या विद्यार्थिनीने बुद्धिमापन स्पर्धेत प्रथम क्रमांक, राखी भागवत कांबळेनी स्वयंस्फूर्त लेखनस्पर्धा प्रथम क्रमांक, प्रितम प्रदीप काळे, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ओम भगवान लव्हराळे, चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.

यात प्रामुख्याने जि.प.उ.प्रा.शाळा माराई पाटण येथील शिक्षकांचे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामान्यज्ञान सतत मार्गदर्शन मुख्याध्यापक, राजु लांजेकर, सहाय्यक शिक्षक, मोरेश्वर राऊत, बाबुराव बानकर, गणेश जरीले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेते स्पर्धकावर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.