राष्ट्वादी महिला काँग्रेसचा अंगणवाडी संघटनेस जाहीर पाठिंबा,

363

जिवती (ता.प्र.) : जिवती तालुक्यातील अंगणवाडी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूच असून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लाऊन शासनाने योग्य भूमिका घेऊन सेविका व मदतनीस यांना न्याय द्यावा.व त्यांच्या मागण्या रास्त अपेक्षित आहेत.यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सुनीता मोसेस नामवाड यांनी सरकारवर निशाणा साधत.सरकारच कुठलही काम असो पहिली आठवण होते ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची,कोविड काळात जगाला आदर्श अस काम महाराष्ट्र राज्यांतील सेविका मदतनीस आशा सेविकांनी केलं आहे.असेही सुनीता नामवाड यांनी सांगितले. आता त्यांना देण्याची वेळ आली तर सरकार वेळकाढूपणा करतेय,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, व जिवती नगर पांचेतच्या नगराध्यक्षा कविताताई गजानन आडे,आपल्यासोबत आहोत.राज्य सरकारकडे आपली व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा तसेच जिवती नगर पांचेतच्या नगरध्यक्षा यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कटिबद्ध राहू असे,जाहीर पाठिंबा दर्शविला त्याप्रसंगी सांगितले.
त्या दरम्यान उपस्थित जिवती राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष अध्यक्षा सुनीता मोसेस नामवाड,नगर पंचायतच्या अध्यक्षा काविताताई गजानन आडे, लताताई ,अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकारी,
कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.