प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)
आल्लापल्ली:- राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व एन. एस.एस. विभागाच्या वतीने आलापली शहरात विद्यार्थिनींची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीला महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य प्रा. कोहपरे सर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य चौक, पेट्रोल पंप, आठवडी बाजाराला वळसा घालून महाविद्यालयापर्यंत परत आली.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अजय बारसागडे सर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गर्गम सर, प्रा. पारखी मॅडम, प्रा. चापले सर,प्रा. बोदलकर मॅडम तसेच रा. से. यो.चे सर्व विद्यार्थिनीनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.नंतर उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.