विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा. पुरूषोत्तम आस्वले उपसरपंच नांदा यांच्या हस्ते ध्वजारोहन

735

जिवती (ता.प्र.) : दिनांक २६ जानेवारी २०२४ ला क्रांतिवीर लहुजी उच्च प्राथमिक शाळा आवाळपूर तथा पिय॔दशि॔नी विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक ग्रामपंचायत यांच्या वतीने आवालपुर येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी आशिष नामवाड सचिव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरिता नामवाड, हिमांशु नामवाड,सुरेश जाधव,वाढई ,रवी बंडीवार,गोहाणे ग्रामपंचायत सदस्य आशा कासारे व प्रमुख अतिथी संस्थेचे कोषाध्यक्ष जयाबाई नामवाड तसेच सरपंच कमळताई जाधव,व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

प्रथमता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर
पुरूषोत्तम आस्वले उपसरपंच नांदा यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येऊन सलामी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राज खंडाळकर यांनी केले.व उच्च प्राथमिक शालांत परीक्षेत प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला पाहिजे,त्या प्रसंगी आशीष नामवाड यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर क्रांतिवीर लहुजी उच्च प्राथमिक शाळा आवाळपूर तथा पिय॔दशि॔नी विद्यालयात येथील विध्यार्त्यांनी उत्कृष्ट असे देशावर आधारीत नृत्य सादर करून प्रेक्षकांची व्हा व्हा मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार रेवंथ राठोड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.