सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने गाव हळहळला वरूर रोड येथे सतीश वलल्ला यांच्यावर अंत्यसंस्कार शेकडो चाहत्यांनी जड अंतकरणाने दिला अखेरचा निरोप

297

वरुर रोड : राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील सतीश वलल्ला यांचे शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते कॅन्सर या आजाराशी झुंज देत होते. सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या सतीशभाऊंनी अवघ्या ४२ व्यावर्षी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरली. आज शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.*

*गावातील कोणताही कार्यक्रम असो त्यात सतीशभाऊंचा सहभाग ठरलेला असायचा. गावातील विद्यार्थ्यांना ते नेहमीच प्रोत्साहित करीत होते. दिवस असो की रात्र सतीशभाऊ गरजुंच्या मदतीला धावून जाण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यामुळे सतीश वलल्ला हे नाव सर्वांसाठी परिचित होते. मागील काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर चंद्रपूर,हैद्राबाद, नागपूर व अन्य शहरात या आजारावर त्यांनी उपचार घेतले.

सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादातून ते या आजारावर निश्चितपणे मात करतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र, काल कॅन्सरसोबतच्या लढाईत ते हरले. सतीशभाऊंनी जगाचा निरोप घेतल्याची वार्ता सर्व गावात परसली. सतीशभाऊ आता आपल्यात नाही, हे ऐकून गावात शोककळा पसरली. सर्वांच्याच डोळ्यासमोर त्यांनी आजपर्यंत गावासाठी केलेले कार्य येत होते. अशा लाडक्या सामाजिक कार्यकर्त्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या घरी गर्दी केली. गावकऱ्यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आज सायंकाळी 5.30 वाजता पानावलेल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बाबा, भाऊ असा बराचमोठा आप्त परिवार आहे. त्यांना या दुखातून सावरण्याचे बळ मिळो, एवढीच गावकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐💐