माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वेलगूर येथे माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन

563

अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथील ७ फेब्रुवारी रोजी आविसं काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वेलगुर दौऱ्यावर येऊन येथील नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.

चर्चेत अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच गावातील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहत कार्यक्रम घेण्यासाठी अडचण येत होते. प्रत्येक वैक्तिकक कार्यक्रम, सण उत्सव किंवा सामाजिक कार्यक्रम असे सर्व प्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच बाकी कार्यक्रम पार पडत असत, असे बैठकी दरम्यान अजय कंकडालवार यांना सांगून माता मंदिर निर्माण करा म्हणून अजय कंकडालवार यांना मागणी केले.

त्यावेळी अजय कंकडालवार यांनी सांगितले की, शासकीय योजनेतुन निधी उपलब्ध होत नाही. मात्र स्व: खर्चाने माता मंदिर बांधून देतो. म्हणून नागरिकांना आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन नुसार माता मंदिर भूमिपूजन अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर्, गीता चालुरकर माजी उपसभापती अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, प्रमोद गोडसेलवार, अस्यांना दुधी माजी सरपंच वेलगुर, मनोहर पाटील चालूरकर, रवी गवत्रे, काशिनाथ गद्धेकर, प्रफुल ओंदरे, सुळता चाकूरकर, कमला राऊत, गणपत मडावी, वासुदेव मडावी, सुगांदा दुधी, निशा झाडे, मीना जंगमवार, सुनीता बावणे, मारोती बावणे, संजय बावणे, दिलीप दुर्गे सह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.