हिवरा येथे चार दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा निरोप.. दलित मित्र वि.तू. नागपुरे डी.एड कॉलेज गोंडपिपरीचे आयोजन…

681

गोंडपिपरी: तालुक्यातील मौजा हिवरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दलित मित्र वि.तू. नागपुरे डी.एड कॉलेज गोंडपिपरी द्वारा राष्ट्रीय एकात्मता व ग्रामीण विकासासाठी दिनांक १४ फेब्रुवारी पासून १७ फेब्रुवारी पर्यंत चार दिवसीय श्रमसंस्कार शिबिर पार पडले.या शिबिराचा निरोप समारंभ सोहळा आज शेवटच्या दिवशी दी.१७ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात पार पडला.

दरम्यान या चार दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात पहिल्या दिवशी दुपारी २:०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थापक अध्यक्ष मा. बाबासाहेब वासाडे यांचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला, त्याच दिवशी रात्रौ संमोहन तज्ञ प्रा. डॉ. डोर्लीकर सर यांनी आपल्या सम्मोहनाच्या माध्यमातून गाववासीयांना जागरूक करण्याचा प्रयत्न करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दुसऱ्या व तिसऱ्या असे दोन दिवस सकाळी डी.एड कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावातील सरपंच व सदस्यांसमवेत गावातील रस्त्यांची साफसफाई व नाली उपसा करून स्वच्छता अभियान राबवीत श्रमदान केले.

या चार दिवसीय शिबिरा दरम्यान दररोज दुपारचे सुमारास जाहीर व्याख्यानातून अनेक जाणकार मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन लाभले.युवकांसमोरील आव्हाने व कर्तव्य की नशीब अशा विविध विषयावर डी.एड विद्यालयाचे छात्र अध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. यादरम्यान जनता विद्यालय गोंडपिंपरीचे प्रा.संतोष बांदुरकर सर, सरस्वती विद्यालय वढोलीचे प्रा. निमसरकर सर, एल.जे.के.कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिपरीचे प्रा.प्रदीप बामणकर सर, कोठारी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आलोक खोब्रागडे सर व सरपंच निलेश पुलगमकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यासोबतच डीएड कॉलेजच्या छात्रअध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सलग दोन दिवस रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत गीते,सामुहिक डान्स,नक्कल,असे विविध सादरीकरणातून गावकऱ्यांचे मनोरंजन केले. दलित मित्र वि.तू. नागपुरे डी.एड कॉलेज गोंडपिंपरीच्या प्राचार्या एम व्ही.सरोदे मॅडम, प्रा. विलास खामनकर, प्रा. दिलीप गजभिये, प्रा.कारडवार मॅडम, प्रा.कांबळी सर,लिपिक श्री.गौरकर व शिपाई श्री.झाडे यांचे या चार दिवसीय श्रमसंस्कार शिबिराला सतत योगदान राहिले. यासोबतच दररोजच्या स्वागतगीतसाठी साथ संगत म्हणून हार्मोनियम वादक जितेंद्र गोहणे,तबला वादक नंदू चौधरी व डी.एड कॉलेजचे छात्रअध्यापक विद्यार्थी योगेश्वर गेडाम यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्यान आज चार दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा शेवटचा टप्पा निरोप समारंभ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे डी.एड कॉलेजच्या छात्र अध्यापक विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.यात गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी व विविध समित्यांचे पदाधिकाऱ्यांनी या निरोप समारंभ सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. स्पर्धेत विशेष पारितोषिक प्राप्त केलेल्या छात्र अध्यापक विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांकडून सिल्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.व निरोप समारंभाचा सोहळा थाटात व हर्षात पार पडला.

यावेळी ठाणेदार श्री.रासकर साहेब,सरपंच निलेश पुलगमकर,उपसरपंच वर्षा कुत्तरमारे, ग्रा.प.सदस्य जितेंद्र गोहणे, पुष्पा हिवरकर, प्रतिमा आक्केवार,अरुणा नेवारे, देवानंद आक्केवार,शा.व्य.स.अध्यक्ष भास्कर चहारे, उपाध्यक्ष लखमापुरेताई,सेवा सोसा.अध्यक्ष दिनेश कुत्तरमारे, उपाध्यक्ष विलास नागापुरे, सुधाकर हिवरकर, हनुमान मंदिर अध्यक्ष देवाजी चहारे,जी. प.शाळेचे मुख्याध्यापक लिंगलवार सर,नैताम सर,मडावी सर, कोमावार सर,प्रा.आ.उपकेंद्राच्या अश्विनी चंद्रागडे, सौ.मांढरे, विशाखा झिलटे, पो.पा.गिरीष रामटेके,माजी सरपंच सुशीला पुलगमकर,माजी उपसरपंच प्रकाश हिवरकर, आशा सेविका भारती चहारे,शंकर येलमुले,दिलीप पुलगमकर, रोजगार सेवक भिवसन चहारे, कुशाबराव पुलगमकर,चांगदेव चहारे, दत्तात्रय येलमुले,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवा सोसायटी सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे छात्र, डीएड कॉलेजचे छात्रअध्यापक अध्यापिका विद्यार्थी,डी.एडचे माजी विद्यार्थी,गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.