कुसुमाग्रज जयंती निमित महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.. प्रा. अजय बारसागडे यांच्या गझलगायनाने रसिक मंत्रमुग्ध…

368

प्रितम म गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली:- आलापल्ली येथील स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात 27 फेब्रुवारी रोजी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. खाडे सर, मराठी विभाग प्रमुख प्रा. गर्गम सर, इतिहास विभागाचे प्रा. चापले सर,प्रा. पारखी मॅडम, प्रा. चेडे मॅडम, प्रा. नागापुरे मॅडम यांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली.

या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता मुख्य गझलाकार म्हणून प्रा. अजय बारसागडे सर यांनी “मनाचा बंद दरवाजा, पुन्हा उघडायला सांगू”,”हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे”, “गेले दिवस आंबे चिचाचे, बोरीच्या खाली बोर येचाचे ” अशा विविध गझलांच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. चापले सर यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून प्रा. गर्गम सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी गझलांची ओळख करून दिली.अध्यक्षीय भाषण प्रा. खाडे सर यांनी मराठीच्या इतिहासावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे आभार धनश्री इंदुरवार या विद्यार्थिनीने केले. शेवटी महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.