नदंवर्धन साक्षरतेसाठी आटापिटा, वयोवृध्द असतानाही दिली परिक्षा

759

-शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

दि १७ : गोंडपिपरी:-तालुक्यातील नदंवर्धन येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित वयोवृध्द 39निरक्षरांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन परिक्षा दिल्याने साक्षरतेसाठीचा आटापिटा आजी आजोबा करताना दिसले.

देशात ५ कोटीहून अधिक लोक निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षर कार्यक्रम पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी परीक्षा अंतर्गत नंदवर्धन येथिल निरक्षरांनी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहून ७० ते ८० वर्ष वय झाले पण आम्ही कुठेही कमी नसल्याचा दाखला देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदवर्धन येथे साक्षरतेची परिक्षा दिली.

शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा असाक्षर व्यक्ती साठी शाळेमध्ये १० ते ०५.०० या वेळात पेपर आयोजित करण्यात आले होते. व्यवहारिक ज्ञान असल्याने पेपर सोडविण्यासाठी काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नदंवर्धन येथील निरक्षरांची उल्लास आॅपला एकूण 93 नोंद असुन त्यात स्त्री 53 तर पुरुष 40 आहेत. त्यापैकी स्त्री 27आणि 12 पुरुष अशा एकूण 39 निरक्षरांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन परिक्षा दिली.

सदर परिक्षा यशस्वी करण्यासाठी शिक्षक इंद्रपाल मडावी यांनी परिश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक चांदेकर ,केंद्र संचालक म्हणून विनोद चांदेकर, पर्यवेक्षक म्हणून अमृता पोटदुखे, राजू राजकोंडावार, सिद्धार्थरवीशंकर रामटेके यांनी काम पाहिले.