नागपूर : एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा उल्लेख केला जात असला तरी शहरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विकासाच्या नावावर शहरात ठिकठिकणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.रस्ता निर्मितीचे व्यवस्थित नियोजन नाही. कुठलाही रस्ता कधीही खोदलेला दिसतो. कुठे केबल टाकण्यासाठी तर कुठे पाइपलाइन टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम सुरू आहे. खोदकामानंतर किती दिवसांत काम पूर्ण करायचे, कोणता रस्ता कधी पूर्ण करावयाचा, कंत्राटदार कोण आहे याची कुठलीही माहिती दिली जात नाही.
यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने नागपूरकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी पूर्वसूचनेशिवाय रस्ता खोदून ठेवल्याच्या तक्रारी आहेत. शहरात चौफेरच अशी स्थिती आहे. याप्रकरण नागरिकांशी संवाद साधत त्यांचा समस्या जाणून घेतल्या. महराजबाग वर्धमाननगर अशा प्रमुख परिसरात केबल व पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. दुसरीकडे सिमेंट रस्त्यांचे कामेही संथ गतीने सुरू आहेत यशवंत स्टेडियम येथील सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात आले; परंतु बाजूला ग लावण्याचे काम केलेले नाही. अशीच परिस्थिती वंजारीनगर जलकुंभाजवळून मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. या रस्त्यांचे काम करण्यात आले; परंत गट्ठ लावण्याचे काम अजूनही अर्धवट आहे. यामुळे अपघाताचा धोका आहे. रस्त व पाइपलाइनच्या कामांचे कोणतेही पूर्व नियोजन नाही, तसेच नागरिकांन यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. मनपाच्या या भोंगळ कारभारावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
सिमेंटीकरण झाले; पण गट्ठ कधी लावणार?
सीताबर्डी व धंतोली प्रमुख बाजारपेठ असल्याने यशवंत स्टेडियम परिसरात वाहनांची कायम वर्दळ असते. स्टेडियम लगतच्या सिमेंट रस्त्यांचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु रस्त्यालगत गट्ठ लावण्यात आलेले नाही. काही ठिकाणी मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताचा धोका असे असतानाही मागील काही दिवसांत गढ लावण्यात आलेले नाही. संबंधित कंत्राटदाराने रस्त्यांचे काम पूर्ण होताच या कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने काम संथ सुरू आहे. अशीच परिस्थिती शहरातील अन्य भागातही आहे.
महाराजबागेच्या गेटजवळ खोदला खड्डा
महाराजबागेत दररोज हजारो लोकांची गर्दी असते. यात प्रामुख्याने लहान मुलांसह २ आलेल्या कुटुंबीयांचा समावेश असतो. त्यात रामदासपेठ भागातील लोकांना सिव्हील लाइन भागात जावयाचे झाल्यास महाराज बाग मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. अशा वर्दळीच्या महाराज बागेच्या गेट लगत मागील १५ दिवसांपूर्वी केबलसाठी खोदकाम करण्यात आले आहे. दोन आठवडे झाले तरी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे वाहनांच्या लांब रांगा लागतात. वाहतुकीची कोडी होत आहे. वाहनांच्या गर्दीतून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी वाहन या खड्यात पडण्याचा धोका आहे. अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन संबंधित कंत्राटदाराला यासंदर्भात विचारणा करून कारवाई का करीत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वर्धमान नगरात पाइपलाइनसाठी खोदकाम
वर्धमाननगर परिसरात सिमेंटचे रस्ते करण्यात आले आहे. या भागात रस्त्यांची कामे करतानाच पाइपलाइन, केबल टाकण्याचे काम करणे अपेक्षित होते; परंतु रस्त्यांची कामे झाल्यानंतर आता रस्त्यालगत पाइपलाइनसाठी खोदकाम केले जात आहे. काम किती दिवसांत पूर्ण होणार, कंत्राटदार कोण याबाबचा कामाच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेला नाही. खोदकामामुळे रस्त्यालगत लावण्यात आलेले गट्टू काढण्यात आले आहे. अपघात होऊ नये यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले; परंतु त्यानंतरही पाइपलाइनच्या खड्यात पडून अपघाताचा धोका आहे. रस्त्यांचे काम करतानाच पाइपलाइनचे काम केले असते तर कमी खर्चात हे काम झाले असते.
पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजणार का?
शहरातील विविध भागात काही खासगी एजन्सीमार्फत कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून खड्डे करण्यात आले आहेत. हे सर्वे खड्डे पावसाळा सुरू होण्यापूर्वी बुजविणे अपेक्षित आहे. जून महिन्याला पावसाला सुरुवात होण्यापूर्वी खोदकामाचे खड्डे न बुजवल्यास त्यात पावसाचे पाणी साचून अपघात होण्याचा धोका आहें. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात कंत्राटदार व संबंधित एजन्सीला निर्देश देण्याची आवश्यकता आहे. सिमेंट रस्ता व डांबरीकरण केल्यावर रस्ते खोदले जातात. एका एजन्सीचे काम झाल्यावर दुसरी एजन्सी पुन्हा नव्याने खोदकाम करते. याचा त्या भागातील नागरिकांना त्रास होतो. कंत्राटदाराची मनमानी मात्र सुरूच राहते. खरे तर ज्या विभागाशी संबंधित काम आहे, त्या विभागाने संबंधित एजन्सीकडून ते काम करून घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.