बालपणीचे मित्र एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला…

874

गोंडपिपरी: इंदिरा नगरारील एका गरीब कुटुंबात जन्मलेले छोटू मडावी,अंकेश झाडे,रियाज शेख,नागेश इटेकर,राजेश देवगडे,सतीश मेश्राम, नाजिर शेख हे सात मित्र बऱ्याच वर्षांनी एक आले.शिक्षण पूर्ण झाल्यावर छोटू मडावी पोलिस दलात सामील झाला.बाकीचे सहा जन नौकरी पासुन वंचित राहले.परंतु समाजात त्यांनी चांगलेच नाव मिळवले आहे.आजघडीला राजेश देवगडे एक मोठा व्यावसायिक झाला,रियाज शेख याने पोलिसात दाखल होण्यासाठी प्रयत्नांची बरीच पराकाष्ठा केली परंतु त्याच्या नशिबी अपयश आले.अंगावर खाकी वर्दीचा रंग लावण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अखेर तो होमगार्डमध्ये दाखल झाला.नागेश इटेकर उत्कृष्ठ पत्रकार असुन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. अंकेश झाडे ठेकेदारी करतो,सतीश मेश्राम दुकान टाकून आपला प्रपंच चालवत आहे. तर नाजीर शेख सीआरपीएफमध्ये सेवा बजावत आहे.

सर्वांचे लग्न झाले आणि आपापल्या संसारात गुरफटले.मात्र त्यांच्या बालपणाची दोस्ती आठवणीत जागी राहिली. संसाराची जिम्मेदारी आल्यावर ते एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते.अधून मधून भेट व्हायची परंतु त्या भेटीला पूर्वीसारखा गोडवा नसायचा.परंतु एक दिवस उजाडला निमित्त होतं नाजीर शेख याचा च्या लहान भाऊ जाकिरच्या लग्नाचे. जाकिरचे १५ मे ला नगभिड तालुक्यातील नांदेड या गावात लग्न होते.लग्नाचे सर्वांना आमंत्रण होतेच परंतु लग्नाला सर्व जन येणार याची शास्वती नव्हती.तेव्हा रियाज शेख या मित्राने योजना आखली.त्याला वाटले या निमित्ताने एक दिवस पुर्वी सारखे जगावे या विचाराने त्याने सर्वांना फोन करून सर्वांनी मिळुन लग्नाला जाऊ आणि लग्न आटपवून घोडाझरी फिरून येऊ असे ठरवले. या निमित्ताने मैत्रीपूर्ण संबंध जपता येईल या गोष्टीचा सर्व मित्रांना मनोमन आनंद झाला.म्हणून त्या दिवशी सर्वांनी आपापली कामे टाकून एकत्र येण्याचे ठरवले.रियाजने लग्नाला जाण्यासाठी एक मस्तपैकी स्कॉर्पिओ गाडी बुक केली.दिवस उजाडला भेटीच्या ठिकाणी सर्व जमले.जमताच एकमेकांना बघून मिठी मारू लागले.सर्वांना आधीसारखे एकत्र पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

सर्व जन जाण्यासाठी गाडीत बसले आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या.बालपणीचे दिवस आठवू लागले,काही आठवणी हाष्यस्पद होत्या तर काही दुःखद त्यामुळे हसणे आणि रडणे या दोन्ही गोष्टी घडल्या.गप्पा गोष्टींचा सडा पाडत लग्न गावी पोहचले. ठरल्या प्रमाणे लग्न आटोपून घोडाझरीला गेलेत.आणि सर्वांनी त्या उत्साही आणि ताज्यातवाण्या वातावरणात रमले.निसर्गमय वातावरणाचा लुप्त घेत जुन्या आठवणींना पाझर फुटला.सतीश मेश्राम याने “बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा”हे गाणे म्हणून सर्वांना भाऊक करुन टाकले.जाकिरच्या लग्नाचा आनंद घेऊन घोडाझरीच्या निसर्गरम्य परिसरात ते मनसोक्त बागडले मैत्रीच्या गप्पा रंगल्या.लग्ना कार्यामुळे एक प्रकारे मैत्रीचा जागर झाला.खरंच मित्रांशिवाय जीवनाचा अर्थ शून्य असुन जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वळणावर मित्रांची साथ असायला पाहिजे.मित्र केवळ आपल्या जीवनाचा ठेवाच नाही तर पुढे मार्गक्रमण करण्याची शक्ती आहे.जाकीरच्या लग्ना समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रत्वाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.