धानापुर गावातील गटारी तुंबल्या,कित्येक वर्षांपासून नाले सफाईचे काम झालेच नाही अखेर सफाईच्या नावावरील अनुदान जातो तरी कुठे..!

737

गोंडपिपरी : तालुक्यातील धानापुर गावातील गटारांची गेली कित्येक वर्षांपासून सफाई केली नसल्यामुळे गटारितून दुर्गंधी सुटत आहे. गटारांगधून वाहणारे सांडपाणी तेथेच थांबून राहत आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी करून देखील याकडे कुणीही लक्ष देत नाही, असा आरोप बाळू वागदरकरसह स्थानिक नागरिकांनी केला आहे.

काही गटारी अर्धवट अवस्थेत आहेत. गटारांतून वाहणारा दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि सांडपण्यावर तरंगणारे जीवजंतु, तुंबलेल्या व अस्वच्छ गटारी ग्रामपंचायतीला दिसत नाहीत का? ग्रामपंचायतचे स्वच्छतेबाबत इतके उदासीन धोरण का अवलंबिले आहे असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे .ज्या अर्थी गटारांचे बांधकाम करण्याकडे ग्रमपंचायतीने जिव्हाळ्याने लक्ष पुरवले तेव्हढेच गटारीच्या स्वच्छतेकडे का वेधले नाही. बांधकामातुन मलिंदा खायला मिळते म्हणुन त्याकडे जातीने लक्ष दिले.परंतु गावातील स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नाही.समोर पावसाचे दिवस सुरू होणार असुन स्वच्छते अभावी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

*बॉक्स* :-

🔷साथीचे आजार जडण्याची शक्यता,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

*गटारांच्या स्वच्छतेविषयी ग्रामपंचायत तर्फे आजपर्यंत कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलली गेली नाहीत. परिणामी, या गटारांची दुरुस्ती व त्वच्छता झाली नही, म्हणुन आगामी काळात येथील नागरिकांना साथीचे आजार जाळण्याची शक्यता आहे.सांडपाणी गटारीत साचून असल्यामुळे तेथून उत्पन्न होणाऱ्या डासांमर्फत नागरिकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे ज्ञात असुन ग्रामपंचायत जाणुनबुजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का, असा संतप्त सवाल बाळू वागदरकर यांनी उपस्थित केला आहे. येथील स्थानिक विचारत आहेत.*