चंद्रपूर: वन विभाग ब्रह्मपुरी मधील तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी, नीयतक्षेत्र, गंगासागर हेटी बिट, कक्ष क्रमांक 90 मध्ये बल्लारशा गोंदिया रेल्वे ट्रॅक लगत रेल्वेच्या धडकेमध्ये तीन चितळ्यांचे मृत्यू झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. नागभीड कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेमध्ये ही घटना घडली. ,रात्री 10 वाजता घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तथा तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी स्वाब संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन मोक्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणून आज सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून त्यापैकी एक मादा चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले.यावेळी तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कंन्नमवार , तळोधी चे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, जिवेश सयाम सदस्य सर्पमित्र, व इतर सदस्य उपस्थित होते.