एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय , वरोडाचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल

1099

वरोडा: एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय , वरोडाचा शालांत परीक्षेचा निकाल या वर्षी सुद्धा 100 %* फेब्रु- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षा बारावीचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या मध्ये कु. क्षमा दिनेश घागरगुंडे हिने 85.33. % गुण मिळवून मुख्य परीक्षा केंद्रातून व महाविद्यालय मधून प्रथम प्राविण्य श्रेणीत ,तर कु. श्रेया शामराव मिलमिले हिने .80.67 % गुण मिळवून महाविद्यालयतुन दुतीय क्रमांक प्राप्त केले त्याचप्रमाणे एकलव्य कनिष्ठ महाविद्यालय चे 22 विध्यार्थी प्रथम श्रेणीत तर 18 विद्यार्थी दूतीय श्रेणीत आले . या सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,महाविद्यालय च्या प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.