धक्कादायक: १२ वी नापास झाल्याचा निकाल पाहिला अन् विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल…

852

चिमूर – मंगळवारी दि. 21 मे २०२४ बारावीचा निकाल जाहीर झाला .सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील एका विद्यार्थ्याने बारावीत अपयश आल्याने जीवनयात्रा संपवली.

आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय १८, रा. नेरी, चिमूर)असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण नेरी गावावर शोककळा पसरली आहे.

आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करीन असा त्याचा आत्मविश्वास होता.

मात्र निकाल लागताच नेट वरून निकाल पाहिला आणि त्याला धक्का बसला. अभ्यास व मेहनत करूनही त्याला इंग्रजी व इतिहास या विषयात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला. त्यामुळे तो नैराश्यात गेला.

घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून दोरीने दुपारी दोन वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.ही  घटना सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने नेरी गावावर शोककळा पसरली आहे.