Homeचंद्रपूरकुडेसावलीत विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न...

कुडेसावलीत विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न…

ग्रा पं कूडेसावलीत जूनी पाण्याची टाकी जिर्णावस्थेत होती. ग्रामस्थांचा मागणीनुसार माजी जि.प.सदस्या सौ वैष्णवीताई अमर बोडलावार यांचा पाठपूराव्याने जल जीवन मिशन योजनेंतर्गत जि प पाणीपुरवठय़ाचा माध्यमातून 96 लक्ष रू चे नविन जलकुंभ चे उद्घाटन झाले व पंधरा वित्त मधून ग्रा पं मार्फत जि प शाळा व अंगणवाडीतील बालकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून1,75000 रू चेRO उपलब्ध करून देण्यात आले. तसेच पंधरा वित्त ,अनू.जाती व नवबौद्ध घटक वस्ती योजनेंतर्गत 10,30,000रू चे नाली बांधकामचे भूमिपूजन सौ वैष्णवीताई अमर बोडलावार यांचा हस्ते करण्यात आले. यानंतरही या गावासाठी विकासकाम आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.पाण्याचा प्रश्न सूटल्याचे श्वास घेत गावकरी त्यांचे आभार मानले.

यावेळी ग्रा पं कडून गावकऱ्यांना डस्टबिन व अंगणवाडीतील मूलांना पाण्याचे बाटल, शाळेतील विद्यार्थांना नोटबूकचे वाटप करण्यात आले.मंचावर मा जि.प.सदस्य अमर बोडलावार, सरपंच मा.मारोती मडावी,उपसरपंच मा.राजेश डोडीवार ग्रा.पं.सदस्य मा. विलास सूर, मा.विलास पिपरे ,सौ.दिपाताई ऊपरे,सौ.नंदाताई सूर,सौ.सूनंदाताई टेकाम, सौ.सूजाताताई गेडाम, पोलीस पाटील सौ.अंगूलीमाला चांदेकर, ग्रा पं सचिव जितेंद्र खोब्रागडे, सर्व शिक्षकवृंद, व मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!