सोमवारी शाळा, महाविद्यालय राहणार बंद

2348

चंद्रपूर : जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूरपरिस्थिती बघता सोमवारी 22 जुलै 2024 रोजी जिल्ह्यातील शाळा ,महाविद्यालये,अंगणवाड्या बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

हवामान खात्याने पुढील 24 तास जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत आश्रय घ्यावा. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.