Homeचंद्रपूरभर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी वरोरा नगरपरिषद...

भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकुन गुन्हे दाखल करा.. वरोरा येथील दूषित पाण्यामुळे मुलाचा मृत्यू…

वरोरा :दूषित पाण्यामुळे पुर्वेश वांढरे ह्या मुलाचा मृत्यू झाल्याने पाणीपुरवठा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाणे आज (दि.१९) ला पहाटे टॉवरवर चढले . सदर मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस या कंपनीविरोधात डहाणे यांनी शिवसेना स्टाईल विरुगिरी आंदोलन पुकारले . सदर आंदोलन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आले.

वरोरा शहरातील मालवीय वार्ड येथील पूर्वेश वांढरे ह्या मुलाचा
दि.५ जुलै २०२४ रोजी दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला . या मृत्यूला विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ही कंत्राट कंपनी कारणीभूत आहे. त्यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पूर्वेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी शिवसेना वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाणे हे तहसील कार्यालयातील टॉवरवर चढले.
विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांनी भर पावसात ही शिवसेना स्टाईल विरुगिरी सुरू करुन मागण्या मंजूर झाल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा इशारा वैभव डहाणे यांनी दिला.
दरम्यान, वैभव डहाणे यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .आंदोलन स्थळी जिल्हाप्रमुख रविद्र शिदे दाखल होतात वरोरा विधानसभाप्रमुख मुकेश जिवतोडे व सर्व शिवसैनिक तसेच काँग्रेस व एनसीपी (शरद पवार गटा) एकत्र आले. वरोरा उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय आधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सोबत सदर आदोलना विषयी चर्चा करुन प्रशासनाचा हलगर्जीपणा आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. नागरिकांवरील अन्याय सहन करणार नाही. याबाबत कायदेशीर कार्यवाही करावी व पुर्वेश याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच त्यात दुषित पाण्याबाबत मृत्यु झाला असे आढळून आल्यास तात्काळ संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी. असे नगर पालिका प्रशासन यांचे कडुन लेखी लिहून घेतले. त्याच प्रमाने पिण्याच्या पाण्याच्या शॅापल मध्ये हेराफेरी करुन कसुर करणाऱ्या विरुध्द तात्काळ कार्यवाही व्हावी .या करीता पुर्वेश चे वडील सुभाष वांढरे यांनी लेखी तक्रार वरोरा पोलिस स्टेशन येथे दाखल केली. सदर प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी कमेटी स्थापन करावी. या मागणी करीता वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात त्यांनी सुध्दा कमेटी नेमण्याचे आश्वासीत केले.
त्यानंतर आंदोलन कर्ते शिवसेनेचा पक्षाचे विधानसभा समन्वयक वैभव डहाने यांनी जिल्हाप्रमुख रविद्र शिदे व विधानसभाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या समक्ष आंदोलनाची सांगता केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!