पाऊसामुळे राळापेठ गावचा तालुक्याशी संपर्क तुटला; शैक्षणिक आणि शासकीय कामावर परिणाम… गावकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अन्यथा आंदोलन करण्याचा सरपंच राऊत यांचा इशारा

457

गोंडपिपरी:- अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रसह चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगजीवन विस्कळीत झाले आहे. यातच तालुक्यातील राळापेठ गावातील पुल पाण्याखाली गेल्याने तालुक्यासोबत संपर्क राळापेठ गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.

राळापेठ येथील पुल पाण्याखाली गेल्याने शासकीय आणि शैक्षणिक कामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गावातील काही नागरिक कसेबसे इतर गावागावातून, शेतशिवारतून मार्ग शोधत स्वतःची शेती व तालुकाचे शहर गाठत आहेत. परंतु गावापासून जवळच असलेल्या आष्टी या गावातील कॉन्व्हेंट व इतर शासकीय शाळेत शिकणारे विद्यार्थी व गोंडपिपरी मार्गावरील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेक दिवसापासून मार्ग बंद असल्यामुळे जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्षच देणे टाळले काय? असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. ही समस्या तात्काळ मार्गी लागली नाही तर प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा सालेझरी(राळापेठ)ग्रामपंचायतीचे सरपंच राजू राऊत यांनी सोशल मीडिया द्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे.